तेजस अर्बन बँक कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी बीड

02442 -223112

info@tejasgroupbeed.com

प्रगती शाळे समोर,

ग्रामसेवक,कॉलोनी नगर रोड बीड

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

तारण कर्ज

तारण कर्ज

मालमत्ता तारण कर्ज (लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – एलएपी) हे स्व-मालकीची मालमत्ता गहाण ठेवून मिळविलेले कर्ज असते. मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या विशिष्ट टक्केवारीनुसार हे कर्ज निश्चित केले जाते. ते सामान्यत: मालमत्तेच्या मूल्याच्या ४० टक्के ते ६० टक्क्यांदरम्यान असते. एलएपी हे खात्रीदायी कर्ज विभागामध्ये मोडते,
जेथे कर्जदार त्याच्या मालमत्तेचा वापर सुरू ठेवत अप्रत्यक्ष तारण म्हणून करतो.

अनेक व्यक्तींसाठी मालमत्ता कर्ज हा सर्वात सुलभ पर्याय असू शकतो. यातून लघुकालीन व्यवसाय गरजा किंवा विवाह, उच्च शिक्षण, सुट्टीमधील योजना आणि अगदी वैद्यकीय आणीबाणीच्या गरजांसाठी आणि महागडे कर्ज फेडण्यासाठीही आíथक व्यवस्था या रूपात करता येतो.

१. अर्जदाराच्या व्यापार / व्यवसाय / उद्योगाच्या गरजेसाठी.
२. व्यावसायिक/ रहिवासी मालमत्तेची दुरुस्ती / नुतनिकरण / वाढीव बांधकामासाठी.
३. घर बांधणी / निवासी गाळा / घर बांधणी किंवा खरेदी तसेच अकृशिक जमीन खरेदीकरिता (विहित कालावधीमध्ये सदर जागेवर घर बांधण्याची हमी देणारे बंधपत्र देणे आवश्यक आहे )
४. अर्जदाराची बाकी असलेली देणी / कर्जे फेडण्यासाठी.
५. वैद्यकीय उपचार / लग्नकार्य / पर्यटन / ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी यांसारखे खर्च अथवा वैयक्तिक आर्थिक गरजा भागवणेसाठी
६. बँकेस मान्य असलेल्या इतर कोणत्याही उदेशाकरीता .

आपल्या हक्काचे तारण कर्ज आता शक्य आहे तेजस अर्बन मध्ये

तेजस ग्रुप
तेजस अर्बन बीड तेजस इलेक्ट्रिकल्स सामाजिक कार्य कर्मचारी मेल लॉगिन